सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या सोशल मीडियावर थरकाप उडवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एका महिलेच्या कानात साप शिरला असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. महिलेच्या कानात कसा शिरला? हे गुपित अद्याप उलगडलेले नाही आणि हा व्हिडिओ कधीचा, कुठला आहे याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
एखाद्या व्यक्तीच्या कानात साप शिरणं ही काही साधी बाब नाही. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती महिलेच्या कानातून साप काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल की, जेव्हा ही व्यक्ती चिमट्याने सापाला पकडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती महिला वेदनेने कळवळते आणि स्थानिक भाषेत काहीतरी बोलू लागते.
जणू ती त्या व्यक्तीला म्हणत आहे, “थांब-थांब, साप हालचाल करतोय.” हे खरंच एक भयावह दृश्य आहे. मात्र, या व्हिडीओमागचे सत्य अद्याप समोर आलेले नाही. @therealtarzann या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत, “कल्पना करा, तुम्ही झोपेतून उठलात आणि तुमच्या कानाबाहेर सापाची शेपटी लटकत आहे, तर तुम्ही पुढे काय कराल?” असे कॅप्शन देण्यात आले आहे. या पोस्टला दीड लाखांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. तसेच कमेंट सेक्शनमध्ये लोक आश्चर्यचकित होऊन आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Discussion about this post