सध्या राज्यात दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा सुरु आहे. मात्र कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. अशातच अहमदनगरमध्ये धक्कदायक प्रकार समोर आलाय. ज्यात बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यात आले.
पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला कॉफी पुरवताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे कॉपी पुरवतानाचा नायब तहसीलदाराचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नायब तहसीलदार अनिल तोडमल यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी देताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बारावी पेपरमध्ये स्वतःच्याच मुलाला नायब तहसीलदार कॉपी पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित नायब तहसीलदारावर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Discussion about this post