नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी बंपर भरतीला सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि या भरती प्रक्रियेबद्दल अधिक. या भरती प्रक्रियेतून नऊ पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेतून सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल ही पदे भरली जातील.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 31 मार्च 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी 31 मार्च 2024 च्या अगोदरच अर्ज ही करावी लागणार आहेत.
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. यामुळे शिक्षणाची आणि वयाची अट ही पदानुसार ठरवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला प्राचार्य, संचालक, रुपलता देवाजी कापगते महाविद्यालय, कोकणा/खोबा ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया या पत्त्यावर पाठवावी लागणार आहेत.
https://nagpuruniversity.ac.in/ या साईटवर देखील आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. इच्छुक उमेदवारांनी भरतीला अर्ज करण्याच्या अगोदर https://onlinedcudrtmnu.org/approval/approval_report/view_print_adv_format_final_5.php?COLLEGE_ID=EG01753&group_ref_no=RTMNU/GRP/1247/2023-24/ZBVFQ7&group_id=1247 ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेला अर्ज करावा.
Discussion about this post