राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होतं नसून अशातच आणखी नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आलीय. अनोळखी आरोपीने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि फरार झाला. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अनोळखी आरोपीचे स्केच तयार केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आठ वर्षीय मुलगी आपल्या चार वर्षीय बहिणीसोबत घरी होती. तिचे आणि वडील नोकरी करत असल्याने, ते घराबाहेर गेले होते. याचवेळी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून एक व्यक्ती तिच्या घरी आला. या व्यक्तीचे वय अंदाजे 40 वर्ष होते. आरोपीने मुलीला घरी तिचे वडील आहेत का? अशी विचारणा केली. यावेळी मुलीने नाही, असं उत्तर दिलं.
यानंतर आरोपीने घरी मुलीचे आई आणि वडील नसल्याची खात्री केली आणि घरात शिरला. पुढे आरोपीने मुलीच्या लहानग्या बहिणीला घराबाहेर ठेवलं आणि या आठ वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. मुलीवर अत्याचार केल्यानंतर हा आरोपी फरार झाला.
घटनेनंतर रात्री मुलीचे आई आणि वडील घरी आले. त्यावेळी मुलीने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला. हे सगळं ऐकून तिच्या पालकांच्या पायाखालून जमीनच सरकली. यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. मात्र आरोपीची ओळख पटत नसल्या पोलिसांनी आरोपीचा एक स्केच तयार करून घेतला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.















Discussion about this post