तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. नागपूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. शिक्षक पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
नागपूर महानगरपालिकेत २६ जागांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी मुलाखतीची तारीख ३० सप्टेंबर आणि ०१ ऑक्टोबर २०२४ आहे.
कोणते पदे भरणार आणि पात्रता काय?
नागपूर महानगरपालिकेत स्पोर्ट्स टीचर आणि संगीत शिक्षक पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा BP.Ed/MP.Ed किंवा B.A/ संगीत विषयात एम.ए पदवी प्राप्त केलेली असावी.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीसाठी तुम्हाला शिक्षण विभाग, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे उपस्थित राहायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २५,००० रुपये पगार मिळणार आहे.
Discussion about this post