मुंबई । औरंगाजेबाच्या कबरीवरून नागपूर पेटलं आहे. सोमवारी रात्री नागपूरच्या महाल भागात मोठा हिंसाचार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारबाबत निवेदन दिले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले राज्यातील नागरिकांना मी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरीता मी आवाहन करतो, आणि त्यासोबत ही देखील चेतावणी देतो. कुणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्याला देखील सोडले जाणार नाही. असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
तसेच फडणवीस पुढे म्हणाले, छावा चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समोर आणला. पण त्यानंतर राज्यात लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या. आणि औरंगाजेबाच्या प्रती लोकांचा राग निर्माण झाला आहे. परंतु महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वानी संयम बाळगला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले.
Discussion about this post