औरंगजेबाच्या कबरीवरुन नागपूरमध्ये मोठा हिंसाचाराची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले होते. त्यांनी पोलीस आयुक्त, एसपी आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. दरम्यान ज्यांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवली त्यांच्यावर कारवाई होईल, तसेच दंगलीत जे काही नुकसान झाले आहे ते दंगे खोरांकडून वसूल केले जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री म्हणाले, हि सर्व दंगल सोशल मीडिया मार्फत काही अफवांमुळे पसरली आहे. त्यामुळे ज्यांनी या अफवा पसरवल्या त्यांच्यावरही कडक कारवाई होणार आहे. जवळपास 68 पोस्ट ह्या ज्या लोकांनी वायरल केल्या त्यांची ओळख पटलेली असून त्यांनी त्या पोस्ट डिलीट देखील केलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली आहेत.
तसेच अजून काही पोस्टबाबत माहिती घेणे चालले आहेत. काही लोकांनी भडकाऊ पॉडकास्ट देखील केली. चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून लोकांमध्ये एक पॅनिक तयार केले. अशा सर्व लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे. हिंसाचारामुळे ज्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामध्ये गाड्या फोडल्या गेल्या, घरे जाळण्यात आली, त्या सर्वांचे नुकसान भरपाई तीन ते चार दिवसांत दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः लक्ष ठेवून आहेत. जे काही नुकसान झाले आहे ते दंगे खोरांकडून वसूल केले जाईल,आणि दंगेखोरांनी ते भरले नाही तर त्यांची मालमत्ता विकली जाईल असा सणसणीत इशारा देवेंद्र फडणीस यांनी दंगेखोरांना दिला.
Discussion about this post