भारत सरकारच्या प्रमुख सरकारी बँक नाबार्डमध्ये विविध पदांसाठी भरती निघालीय. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरुदेखील झाली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.nabard.org वर जाऊन अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ आहे.
नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ग्रामीण विकास, कृषी वित्त आणि सहकारी संस्थाना प्रोत्साहन देण्याचे काम करते. या बँकेत डेटा सायंटिस्ट/ AI इंजिनियर / डेटा इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
पात्रता :
डेटा सायंटिस्ट / AI इंजिनियर आणि डेटा इंजिनियर पदासाठी बी.ई / बी.टेक पदवी प्राप्त केलेली असावी. किंवा एम.ई / एमटेक / एमसीएस कॉम्प्युटर सायन्स / आयटी / डेटा सायन्स / मशीन लर्निंग / एआय डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत डेटा मॅनेजमेंट पदासाठी कोणत्याही विषयात मास्टर्स पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत कामाचा अनुभव असावा.
डेटा सायंटिस्ट / एआय इंजिनियर पदासाठी २१-३० लाख रुपये पॅकेज मिळणार आहे. डेटा इंजिनियर पदासाठी १८ ते २७ लाख रुपये पगार मिळणार आहे. डेटा सायंटिस्ट कम बीआय डेव्हलपर पदासाठी १५ ते २१ लाख आणि स्पेशलिस्ट पदासाठी १२-१५ लाख रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २५ ते ४० वयोगटातील असावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड इंटरव्ह्यू, अनुभवाच्या आधारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी लेखी परीक्षा द्यावी लागणार नाहीये.
Discussion about this post