सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेवलपमेंटमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. ()
नाबार्डमध्ये बँक मेडिकल कंसल्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी nabard.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
नाबार्डच्या या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२५ आहे. मेडिकल कंसल्टंट पदासाठी भरती जाहीर केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच जनरल मेडिसिनमध्ये ग्रॅज्युएशन केलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कमीत कमी २ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीनंतर मेडिकल फिटनेस टेस्ट आणि कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. या नोकरीसाठी कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करा. त्यानंतर जनरल मॅनेजर, नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्लपमेंट, अंदमान आणि निकोबर क्षेत्रीय कार्यालय येथे अर्ज पाठवायचा आहे.















Discussion about this post