चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. नॅशनल अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हपमेंट बँकेत भरती निघाली आहे. बँक मेडिकल ऑफिसर भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली असून इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीबाबत सविस्तर माहिती nabard.org या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट आहे.
आवश्यक पात्रता :
नाबार्डमधील या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे एमबीबीएस (MBBS) पदवी प्राप्त केलेली असावी. ही पदवी भारतीय चिकित्सा परिषद (MCI)द्वारे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त केलेली असावी.उमेदवारांनी जनरल मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे.
नाबार्डमधील बँक मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ७० वर्षे असावी. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.नाबार्डमधील या नोकरीसाठी अर्ज करताना कोणतेही शुल्क भरायचे नाही.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. याबाबत सविस्तर माहिती nabard.org वरील अधिसूचनेत देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.तुम्हाला अर्ज चीफ जनरल मॅनेजर, नाबार्ड, पश्चिम बंगाल रिजनल ऑफिस, नाबार्ड भवन, प्लॉट नंबर २, डीपी ब्लॉक, स्ट्रीट ११, सेक्टर V, सॉल्ट लेक, कोलकत्ता येथे पाठवायचा आहे.
Discussion about this post