निमोनियासदृष रहस्यमय आजाराचा चीनमध्ये सध्या कहर सुरु असून यामुळे चीनने पुन्हा एकदा जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. चीनमधील सध्याची स्थिती कोरोना काळाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारी आहे.
आता चीनमध्ये रहस्यमय आजारामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या लहान मुलांची बालकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहून आरोग्य अधिकारी चिंताग्रस्त झाले आहेत. लहान मुलांना होणाऱ्या या आजाराबाबत WHOनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने या महिन्याच्या सुरुवातीला सादर केलेल्या अहवालात म्हटलं की, इन्फ्लूएंझा आणि सामान्य बॅक्टेरियाच्या संसर्गाचा प्रसार, म्हणजे कोविड-19 उपाय हटवल्यामुळे, मायकोप्लाझ्मा न्यूमोनियासह लहान मुलांवर परिणाम करणारे श्वसनाचे आजार वाढले आहेत.
आजाराची लक्षणे
मुलांच्या फुफ्फुसात सूज येणे. उच्च तापासह अनेक असामान्य लक्षणे आढळून आली आहेत. याशिवाय नाक वाहणे, खोकला, एसओबी, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. इन्फ्लूएंझा व्हायरस, एन्टरोव्हायरस, राइनोव्हायरस आणि कोविड व्हायरससारखे अनेक विषाणू आहेत ज्यामुळे अशी लक्षणे उद्भवू शकतात.
भारताला धोका आहे का?
भारताचा शेजारी असलेल्या चीनमधील या स्थितीची आपल्याला किती धोका आहे, हे आताच सांगणे थोडे कठीण आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते यावर त्वरित उपचाराची गरज आहे. सुरुवातीचे जे अहवाल येत आहेत त्यानुसार हा रोग अत्यंत संसर्गजन्य असू शकतो. त्यामुळे कोरोनासारखी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी त्यावर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचं आहे. सध्यातरी भारताला यातून फार धोका दिसत नाही. मात्र खबरदारी बाळगणे आवश्यक आहे, असं तज्ज्ञ सांगतात.
Discussion about this post