भूकंपाच्या धक्क्यांनी म्यानमार आणि थायलंड हे दोन देश उद्ध्वस्त झाले आहे. म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या 7.7 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपामुळे इमारती कोसळल्या, पूल पडले आणि रस्ते खचले. यामुळे आतापर्यंत ७०० नागरिकांचा मृत्यू झाला. तर १६७० जण झखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चिनी वृत्तसंस्था शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, म्यानमारच्या सीमेवरील नैऋत्य युनान प्रांतातही जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. पण तिथून कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही.भूकंपाच्या धक्क्यामुळे थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये अनेक उंच इमारती कोसळल्या. बांधकाम सुरू असलेली ३० मजली इमारत कोसळून यामध्येही अनेकांचा मृत्यू झाला.
महत्वाचे म्हणजे, म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपाचे धक्के थायलंड, बांगलादेश, भारत, लाओस आणि चीन या ५ शेजारील देशांमध्येही जाणवले. भारतातील पश्चिम बंगाल आणि मणिपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. ७.३ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर बांगलादेशमध्येही सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, म्यानमार आणि थायलंड या दोन्ही देशाच्या मदतीला भारत देश धावून गेला आहे.
म्यानमार सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे प्रभावित झालेल्या भागात रक्तदानाची मोठी गरज आहे. संयुक्त राष्ट्रांनी तात्काळ मदत कार्यासाठी ५ दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली. दोन्ही देशांमधील रुग्णालयांमध्ये जखमींची संख्या सतत वाढत आहे.
Discussion about this post