लातूर । लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने लातूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे
या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी आयुक्तांची रिव्हॉल्वर ताब्यात घेतली असून, या घटनेच्या मागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आतापर्यंत मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. ही घटना लातूर शहरात चर्चेचा विषय बनली असून, नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. मनोहरे यांनी कौटुंबिक कारणामुळे की त्यांच्यावर कार्यालयीन तणावात हा निर्णय घेतला, याबाबत लातूरमध्ये चर्चा सुरू आहे.
बाबासाहेब मनोहरे हे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला, हे अजूनही गूढच आहे. पोलिस तपासातून याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सध्या सर्वांचे लक्ष मनोहरे यांच्या प्रकृतीकडे आणि या घटनेच्या तपासाकडे लागले आहे. ही घटना लातूरसह संपूर्ण राज्यात खळबळ माजवणारी ठरली आहे.
Discussion about this post