नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून याबाबत मुंबई युनिव्हर्सिटीने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
प्रयोगशाळा असिस्टंट, ग्रंथालय सहाय्यक, इलेक्ट्रशियन, सुतार, प्लंबर, चालक, मल्टी टास्क ऑपरेचरसह इतर अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदवीधर, डिप्लोमा केलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.वित्त आणि लेखा सहाय्यक पदासाठी कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. स्टेनोग्राफर पदासाठी कॉमर्समध्ये पदवी, स्टेनोग्राफी प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल) पदासाठी संबंधित क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा प्राप्त केलेला असावा. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स) पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. लॉ असिस्टंट पदासाठी कायद्याची पदवी प्राप्त केलेली असावी.
प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत टायपिंग, एमएस-सीआयटी प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. इलेक्ट्रिशियन पदासाठी इलेक्ट्रिशियन पदवी प्राप्त केलेली अशावी. मल्टी टास्क ऑपरेटर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी.
मुंबई विद्यापीठात एकूण ९४ पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही NATS 2.0 पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२५ आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अप्रेंटिस पदासाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे अप्रेंटिसशिपचा कालावधी पूर्ण झाल्यावर नोकरी करण्याचे तुमच्यावर कोणतेही बंधन असणार नाही,
Discussion about this post