भुसावळ : रेल्वेने उन्हाळी हंगामात मुंबई ते उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि वाराणसीदरम्यान आठ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष गाड्यांचा तपशील
लोकमान्य टिळक टर्मिनस- वाराणसी साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या) ०४२२७ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी दि. ६ ते २७ मेदरम्यान दर सोमवारी १३:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३:२० वाजता वाराणसी येथे पोहोचेल. (४ फेऱ्या)
०४२२८ साप्ताहिक विशेष वाराणसी येथून ४ ते २५ मे दर शनिवारी २२:२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे तिसऱ्या दिवशी १०:३० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
या स्थानकांवर थांबा
या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई कानपूर, छावणी, झाशी, लखनौ, अयोध्या, उरई, अयोध्या शाहगंज आणि जौनपूर आदी ठिकाणी थांबे आहेत















Discussion about this post