मुंबई । मुंबईतील लालबाग परिसरात एक भयानक घटना घडली असून लालबागच्या गजबजलेल्या परिसरात एक बस घुसली आहे. या भीषण अपघातात 8 ते 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे, हा अपघात एवढा भीषण होत की रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक बसून त्यांचेही मोठे नुकसान झाले.
दरम्यान, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना मुंबईत खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे. मात्र याच दरम्यान बेस्ट बसची मार्गिका क्रमांक 66 ही बस लालबागहून जात होती. बसचे ड्रायव्हर कमलेश प्रजापती ( वय 40) हे चालवत असलेली बस गणेश टॉकीजजवळ पोहोचली, मात्र तेव्हाच दत्ता मुरलीधर शिंदे ( वय 40) याने जबरदस्तीने स्टीअरिंग व्हीलवर ताबा मिळवत ते डावीकडे फिरवले.
मात्र चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस धाडकन समोरच्या दोन वाहनांवर धडकली. तसेच काही पादचाऱ्यांनाही बसची जोरात धडक बसली. अचानक बस वेडीवाकडी चालू लागल्याने तेथील नागरिक घाबरले आणि एकच पळापळ झाली. यामध्ये आठ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यानंत बस चालकाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.















Discussion about this post