मुंबई । मागच्या तीन वर्षांपासून कोरोना आवाक्यात असून मात्र अशातच मुंबईमध्ये करोना वाढतोय. करोनाची लागण झालेले आठ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून उपाय केले जात आहेत.
मुंबईच्या केईएम रुग्णालयात काल दोन कोव्हिड सदृश्य असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठ रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले गेले. या रुग्णांना वेगवेगळ्या व्याधींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरीही, त्यांचा रिपोर्ट कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे. सर्व नागरिकांनी, मुंबईकरांनी सावधगिरी पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Discussion about this post