जळगाव प्रतिनिधी | उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्ये रेल्वेने भुसावळ ते मुंबई सेंट्रल विशेष गाडीच्या कालावधीत काढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.
रेल्वे क्रमांक ०९०५१ मुंबई सेंट्रल ते भुसावळ त्री साप्ताहिक विशेष रेल्वे ३० एपिलपर्यंत होती; परंतु तिचा कालावधी वाढवला असून, आता ही रेल्वे ३० जूनपर्यंत चालवण्यासाठी वाढवण्यात आली आहे. रेल्वे क्रमांक ०९०५२ भुसावळ ते मुंबई सेंट्रल त्रि साप्ताहिक विशेष रेल्वे १ मे पर्यंत होती. आता ती १ जुलैपर्यंत चालवण्यासाठी वाढवली आहे. या रेल्वेच्या वेळ, थांबा आणि रचनामध्ये कुठलाही बदल केलेला नाही. आरक्षण बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्र, आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू आहे.
Discussion about this post