मुक्ताईनगर । गेल्या काही दिवसापासून केळीचे भावघसरले. भाव नसल्याने पिकाला लावलेला खर्च देखील निघणार नाही, अशी परिस्थिती झाली आहे. यातच मुक्ताईनगरातील एका शेतकऱ्याने शेतातील दीड हजार खोड असलेली केळी बाग जेसीबीने उपटून फेकली आहे.
जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात एका शेतकऱ्याने: केळी कमी भावात मागितली जात असल्याने लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील शेतकरी सतीश चौधरी यांनी मानेगाव शिवारात असलेल्या दीड हजार खोड असलेली केळी बाग जेसीबीने उपटून फेकली आहे. यामुळे शेतकऱ्याने आतापर्यंत लावलेला खर्च वाया गेला आहे.
सतीश चौधरी यांचे मानेगाव शिवारात शेत आहे. १५०० खोड लावून त्यांनी केळी बाग फुलविली. खते आणि न्यूट्रिएन्टवर मोठा खर्च केला. परंतु केळी कापणीस आल्यावर व्यापारी ४०० ते ५०० रुपये दराने केळीची मागणी करीत आहेत. लागवडीपासून उत्पादन निघेपर्यंतच्या खर्चावर कापणीचा व वाहतूक खर्च हा वरचढ ठरल्याने चौधरी यांनी थेट केळी बाग उपटून फेकली आहे. आता खरिपात कपाशी लागवड करण्याची तयारी सुरू केली आहे.















Discussion about this post