मुक्ताईनगर । भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने नायगाव येथील भागवत महारू कोळी व पुंडलिक रामकृष्ण कोळी यांचा अपघाती मृत्यू झाला. मुक्ताईनगर पोलिसात लखन मोरे (लोहारखेडा) यांनी खबरीनुसार अपघाताची नोंद करण्यात आली.
मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ पांढर्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप (एम.पी.09 डी.एस.6687) ने दुचाकी (एम.एच.19 बी.ए.0356) ला दिलेल्या धडकेत नायगाव येथील पुंडलिक रामकृष्ण कोळी (वय 54) व भागवत महारु कोळी (62) या दोघांचा मृत्यू झाला. भागवत कोळी हे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख होते.
अपघाताची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ सकाळीच नायगाव येथे कोळी कुटुंबीयांचे घरी जात कुटुंबांचे सांत्वन केले. पिकअप वाहनचालक धर्मेंद्र नंदकिशोर साहू (रा. इंदौर) यास अटक करण्यात आली मृत दोघांवर नायगाव येथे एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
Discussion about this post