मुक्ताईनगर । हत्येच्या एका घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावाजवळच्या जंगलात तरुणाची हत्या करून मृतदेह पुर्णा नदीपात्रात फेकून देण्याची आल्याची घटना उघडकीस आली. नितीन साहेबराव पाटील (वय २५, रा. कला वसंत नगर, आसोदा रोड, जळगाव) असं मृत तरुणाचे नाव आहे.
जळगाव शहरातील नितीन पाटील या तरुणाला काही जणांनी काल पैशांच्या वादातून मुक्ताईनगर येथे नेले होते. मात्र त्याचा संपर्क होत नसल्याने त्याचे कुटुंबिय हे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात आले. याप्रसंगी नितीन पाटील यांच्या सोबत असणारा एक युवक देखील पोलीस स्थानकात आला. या तरूणाने काही जणांनी नितीनला कुंड गावाजवळच्या जंगलात मारून त्याचा मृतदेह पुर्णा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणार्या तरूणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असून त्याचा तपास देखील सुरू आहे.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला ही माहिती कळताच त्यांनी आज शुक्रवारी पहाटेपासून पूर्णा नदीपात्रात मृतदेहाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तब्बल 9 तासांनी त्यांना मयत नितीन पाटील यांचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत सापडला.खूनाच्या घटनेमुळे मुक्ताईनगर हादरले असून प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.















Discussion about this post