मुक्ताईनगर मतदार संघात शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील 20 हजार840 मतांनी आघाडीवर आहेत.
तर रोहिणी खडसे पिछाडीवरच आहेत. यामुळे एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे.अकराव्या फेरी अखेर आमदार चंद्रकांत पाटील 20 हजार840 मतांनी आघाडीवर आहे.
जळगाव जिल्हाच नव्हे तर राज्यातील सर्वात वलयांकीत मतदारसंघ म्हणून मुक्ताईनगरकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांना अटीतटीच्या सामन्यात पराभूत केल्यानंतर ते शिवसेनेत आणि नंतर शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यांना यंदा पुन्हा एकदा रोहिणी खडसे यांनी आव्हान दिले. चंद्रकांत पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर महायुतीचे उमेदवार म्हणून तर रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या होत्या. यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी दिली होती. तर मोठे शासकीय कंत्राटदार म्हणून ख्यात असलेले विनोद सोनवणे यांनी देखील अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उडी घेतली होती. परिणामी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत झाली.















Discussion about this post