जळगाव : भुसावळ शहरातील हद्दपार असलेला आरोपी मुकेश भालेराव याचे शव मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा आरोपीच्या शोधात होते. या तपासणीत चार आरोपी निष्पन्न झाले असून दोन महिला व दोन अल्पवयीन आरोपी असल्याचे डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे यांनी सांगितले. यामध्ये आरोपीची पत्नी सुद्धा सहभागी असल्याचे उघड झाले आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
भुसावळ शहरातील मुकेश भालेराव या सराईत गुंड असलेल्या तरूणाची क्रूर हत्या करून त्याला गाडून टाकण्यात आल्याची घटना उघड झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मुकेश प्रकाश भालेराव ( वय 31, रा. टेक्नीकल हायस्कूल मागे, भुसावळ ) याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. प्रशासनाने भालेरावला नाशिक येथे स्थानबध्द देखील केले होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याला हद्दपार केले होते. हद्दपार असतांनाही भालेराव होळीच्या दिवशी रात्री भुसावळ येथील घरी आलेला होता
मुकेशच्या दुसऱ्या पत्नीस एक सतरा वर्षाची एक मुलगी असून नराधम मुकेशने या मुलीवर शारीरीक अत्याचार केले. त्यामुळे येथील राहत्या घरातच त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर मुकेशचे शव तापी नदीच्या किनारी टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून दोन महिला तर दोन संशयित आरोपी हे अल्पवयीन आहेत अशी माहिती डी. वाय. एस. पी. कृष्णांत पिंगळे यांनी दिली.
Discussion about this post