महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विभागीय कार्यालयात भरतीसाठी जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे या नोकरीसाठी तब्बल २६३ जागा रिक्त आहेत. या नोकरीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात चेक करा. या नोकरीसाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाने या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहे. १६ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. मेकॅनिक मोटर व्हेईकल पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनियरिंग किंवा डिप्लोमासाठी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडनध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.इलेक्ट्रॉनिक्स, शीट मेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, पेंटर, वेल्डर पदासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असावे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी www.mhrdnts.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे.या नोकरीसाठी तुम्ही ३ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जळगाव येथे पाठवू शकतात.
Discussion about this post