महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. महामंडळाने नुकतीच 367 उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून ही भरती प्रामुख्याने आयटीआय (ITI) आणि अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदविकाधारक उमेदवारांसाठी आहे. यामुळे राज्यातील कुशल तरुणांना सरकारी सेवेमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग खुला झाला आहे. नाशिक विभागीय कार्यालयाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या या भरतीमध्ये विविध प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
ही भरती प्रशिक्षणार्थी पदासाठी जाहीर करण्यात आली असून प्रशिक्षणाचे ठिकाण नाशिक येथे असणार आहे. इच्छुक उमेदवारांचे वय 14 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.
या रिक्त पदांसाठी होणार भरती
ही भरती अभियांत्रिकी पदवीधर, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक), पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर आणि कारपेंटर या पदांसाठी होणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 ऑगस्ट 2025 आहे. इच्छुकांनी सर्वात आधी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर खालीलप्रमाणे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. शिकाऊ उमेदवारांच्या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी.पटेल रोड,शिंगाडा तलाव नाशिक येथे अर्ज नमुना मिळणार आहे. तो भरुन सबमिट करायचा आहे.
असा करा अर्ज
सर्वात आधी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावी. त्यानंतर वेबसाइटवरच ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज भरल्यानंतर त्याचा नमुना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी.पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक येथे उपलब्ध होईल. तो नमुना घेऊन योग्य प्रकारे भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रांसह त्याच कार्यालयात सादर करावा लागेल. या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक येथे प्रशिक्षण दिले जाईल.
Discussion about this post