बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. विशेष पदवी पास तरुणांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
ट्रेनी असोसिएट आणि ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर होती. मात्र, ही तारीख वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.
७५ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेतील या भरतीसाठी ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ११७० रुपये फी भरायची आहे तर ट्रेनी असोसिएट पदासाठी ११८० रुपये शुल्क भरायचे आहे. २१ ते ३२ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. तुम्ही www.mscbank.com या वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती वाचू शकतात.















Discussion about this post