महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र उमेदवार एमएससी बँकेच्या अधिकृत वेबसाइट mscbank.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. सदर भरती अंतर्गत एकूण १५३ पदांवर भरतीद्वारे नियुक्त्या करण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी : ४५ जागा
प्रशिक्षणार्थी लिपिक १०७ जागा
कनिष्ठ अधिकारी श्रेणीमध्ये स्टेनो टायपिस्ट : १ जागा
वयोमर्यादा: 21 ते 32 वर्षे
अर्ज शुल्क (जीएसटीसह): प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – रु. 1,770/-, प्रशिक्षणार्थी लिपिक – रु. 1,180/-, कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो टायपिस्ट – रु. 1,770/-.
भरतीसाठी पात्रता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी
निवड प्रक्रिया :
ऑनलाइन लेखी परीक्षा, वैयक्तिक मुलाखत किंवा कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
लेखी परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत असेल.
वैयक्तिक मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी, उमेदवारांना पात्रता गुण म्हणून एकूण गुणांच्या किमान ५० टक्के म्हणजेच १०० गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल.















Discussion about this post