महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण ६१५ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी विद्यार्थ्यांना ११ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
तर पीएसआयची पूर्व परीक्षा ही २ डिसेंबरला होणार आहे. अनेक वर्षांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ६१५ जागांची जाहिरात आल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.
या पदभरतीसाठी विद्यार्थी अनेक दिवसांपासून वाट बघत होते. पीएसआय पदासाठी अमागास उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे तर मागासवर्गीय उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० राहणार आहे. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणीनंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. ६१५ पदांसाठीची ही जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून विद्यार्थ्यांना येथे भेट देऊन सविस्तर माहिती घेता येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023 (11:59 PM)
परीक्षा केंद्र: छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.
Discussion about this post