पुणे । एमपीएससी (MPSC) टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, राहुलला ताब्यात घेतल्यानंतर दर्शना पवारच्या हत्येचं कारणंही आता समोर आलं आहे.
का केली हत्या?
दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक आहे. दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एम पी एस सी ची परीक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमधे दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारीकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एम पी एस सीची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा. तो देखील परूक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि कुटुंबियांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.
राहुल हत्येच्या दिवसापासून गायब
दर्शना पवार तिचा राहुलसोबत १२ जूनला राजगडावर फिरायला गेली होती. मात्र जवळील हॉटेलच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये राहुल एकटाच राजगडावरुन खाली उतरताना दिसला होता. त्या दिवसापासून राहुल हांडोरे गायब होता. त्यामुले दर्शनाची हत्या राहुलनेच केल्याचा संशय पोलिसांना होता. त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी पाच पथकंही तयार केले होते.
Discussion about this post