महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने नवीन भरती जाहीर केली आहे. एमपीएससीने जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य गट अ पदांसाठी ही भरती होत असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. एमपीएससीने जवळपास २२५ रिक्त पदांसाठी भरती होणार. वैद्यकीय व आरोग्य सेवेत ही भरती केली जाणार आहे. यामध्ये राखीव प्रवर्गासाठी, खेळाडू, महिला, दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव जागा देण्यात आल्या आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २१ जानेवारी म्हणजेच उद्यापासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचसोबत ऑनलाइन पद्धतीने अर्जशुल्कदेखील भरायचे आहे. (MPSC Recruitment 2025)
आरोग्य विभागात ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत पोस्ट ग्रॅज्युएशन देखील केलेलं असायला हवे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३८ वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. हे वय १ मे २०२५ पर्यंत मोजले जाईल.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७१९ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ४४९ रुपये फी भरायची आहे.अर्ज करताना तुम्हाला https://mpsconline.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर सूचना वाचून तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर अर्ज शुल्क भरुन सबमिट करायचा आहे.
Discussion about this post