एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत पास होऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुम्हीही एमपीएससी परीक्षेची तयारी करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक पोलिस उपनिरिक्षक दुय्यम निबंधक/ मुंद्राक निरीक्षक या पदांसाठी भरती सुरु आहे.
एमपीएससीने या विविध पदांच्या एकूण ४८० रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. पदवीधर उमेदवारांना खरोखर ही मोठी संधी आहे. अर्ज करण्याचा कालावधी 26 डिसेंबर 2024 ते 06 जानेवारी 2025 आहे.
पदाचे नाव :
1) सहायक कक्ष अधिकारी,गट ब 55
2) राज्य कर निरीक्षक,गट ब 209
3) पोलीस उपनिरीक्षक,गट ब 216
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी
या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबतची सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्याआधी तुम्ही अधिसूचना नीट वाचावी.
Fee: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]
जाहिरात (PDF) | Click Here |
Discussion about this post