तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी येथे एकूण १३३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.ज्युनियर टेक्निशियन, ज्युनियर मॅनेजर आणि डिप्लोमा टेक्निशियन पदासाठी ही भरती केली जाणार आहे. यामध्ये विविध टर्नर, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, इलेक्ट्रिक फिटर, मिलराइट, एक्सामिनर, एन्व्हायर्नमेंटल इंजिनियरिंग, टूल डिझाइन अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात शिक्षण घेतले असेल तर तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. एन्व्हायर्नमेंटल इंजिनियरिंग पदवी, मेकॅनिकल इंजिनियरिंग डिप्लोमा पास केलेले उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
ज्युनिअर टेक्निशियन पदासाठी २१,००० ते ३४,२२७ रुपये पगार मिळणार आहे. ज्युनिअर मॅनेजर पदासाठी ३०,००० ते ४७,६१० रुपये पगार मिळणार आहे. डिप्लोमा टेक्निशियन पदासाठी २३,००० ते ३७,२०१ रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. चीफ जनरल मॅनेजर, मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, युनिट ऑफ एव्हीएनएल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एनटरप्राइज अंबरनाथ, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथे अर्ज पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्याआधी भरतीची जाहिरात वाचावी.















Discussion about this post