जळगाव । लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून तशा हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार हे आपल्या सहकार्यांसह मोठा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असून लवकरच ते शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश करण्याचे संकेत मिळत आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेषदादा पाटील यांची कामगिरी चांगली असतांना देखील त्यांचे तिकिट कापल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. भाजपकडून उन्मेष पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली जाईल, अशी दाट शक्यता होती. मात्र भाजपच्या नेतृत्वाने ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर केला आणि स्मिता वाघ यांची महायुतीच्या उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे सहाजिकच उन्मेष पाटील नाराज झाले. उन्मेष पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजेच उन्मेष पाटील यांच्यासह पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार, पाचोरा येथील भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली आहे.
Discussion about this post