देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. यात काही पक्षांनी नव्यांना संधी देऊन जुन्यांना घरी बसविले आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आलीय. तामिळनाडूमध्ये ड्रविड मुन्नेत्र कझगमचे पक्षाचे नेते, खासदार गणेशमूर्ती यांनी पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज गुरुवारी सकाळी खासदार गणेशमूर्ती यांनी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू इरोड लोकसभा मतदारारसंघात द्रमुक पक्षाने गणेशमूर्ती यांचं तिकीट कापलं होतं. त्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना २४ मार्चला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं.
खासदार गणेशमूर्ती यांना रुग्णालयात तपासानंतर आयसीयूमध्ये दाखल केलं होतं. तर त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. पुढे त्यांना कोयंबटूरमधील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र आज गुरुवारी सकाळी खासदार गणेशमूर्ती यांनी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
का होते नाराज?
तीन वेळा संसदेत निवडून गेलेले गणेशमूर्ती यांनी एमडीएमके पक्षातील अनेक पदे भूषवली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते तामिळनाडूमधील इरोड या लोकसभा मतदारसंघातून पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. या मतदारसंघात डीएमके पक्षाने उमेदवार उभा केला तर तिरुचिमधील जागा एमडीएमके यांना देऊ केली. एमडीएमके पक्षाचे महासचिव वाइको यांचा मुलगा दुरई वाइको यांना उमेदवारी जाहीर केली होती.
दरम्यान, पक्षातील नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार गणेशमूर्ती यांतं पार्थिव इरोडच्या पेरियार नगरमधील घरी आणण्यात येईल. त्यानंतर सार्वजिक ठिकाणी श्रद्धांजलीसाठी ठेवण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर कुटुंबात देखील वाद सुरु होते.















Discussion about this post