गुना : अपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे. डंपर ट्रकला धडकल्यानंतर बसला भीषण आग लागली आहे. या आगीत 13 जणांचा होरपळून झाला आहे. या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात घडली. गुना-आरोन रोडवर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका डंपरने एका प्रवासी बसला धडक दिली. यानंतर बस पलटी होऊन त्यात आग लागली.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मोहन यादव यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, “गुना ते आरोनला जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याने प्रवाशांचे नुकसान झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या हृदयद्रावक अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. या दु:खाच्या परिस्थितीत राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे.”















Discussion about this post