मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर या लढतीत महायुतीने तब्बल २३० जागांवर दणदणीत विजय मिळविला. यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून मोठ्या विजयानंतर भाजपात मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे. विधीमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीतून 2 निरीक्षक पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
द्रीय भाजपकडून 2 निरीक्षक राज्यात पाठवले जाणार आहेत. विधीमंडळ नेता निवडीनंतरच भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. भाजपची उद्या महत्त्वाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. भाजप पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही आज मोठ्या हालचाली घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीची आज बैठक पार पडल्याची माहिती आहे.
शिवसेनेत काय ठरलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही निकालानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. तर सिद्धेश कदम यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गट नेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर नेत्यांची निवड करण्याचे सर्वांधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला.















Discussion about this post