मुंबई । राज्यात सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान नेते मंडळींमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जात आहे. यातच २०१९ मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा त्याची चर्चा सुरु झाली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतचा गौप्यस्फोट केलाय.
शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर सत्तास्थापनेची रणनीती ठरल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले. ११ नोव्हेंबर २०१९ मध्ये मला शरद पवारांचा फोन आला होता. अजित पवार यांना तुमच्याकडे पाठवतो, असे सांगितले होते. त्यानंतर सत्तास्थापनेची बैठक झाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी टाइम्स ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले की, २०१९ मधील सत्तास्थापनेच्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. त्याशिवाय अजित पवार, प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. या बैठकीला अदानी उपस्थित नसल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत सत्तास्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र आणण्यासाठी बैठक झाली होती. ही बैठक अदानी यांच्या निवास्थानी झाली नाही. त्या बैठकीला अदानी उपस्थित नव्हते. सत्तास्थापनेच्या बैठकीला शरद पवार, अमित शाह, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.















Discussion about this post