मुंबई : तुम्ही जर एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या 78 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
आजारपणाचं कारण देत एअर इंडिया एक्सप्रेसचे कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचं विलिनीकरण होणार आहे. त्यामुळे आपली नोकरी धोक्यात असं असं दोन्ही एअरलाईन्सच्या वैमानिक आणि केबिन क्रूच्या भावना आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी विरोध करत असून सामूहिक रजेवर गेले आहेत. परिणामी 78 आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत.
एअर इंडिया एक्सप्रेसकडून निवेदन जारी
एअर इंडिया एक्सप्रेसनं एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, “आमच्या वरिष्ठ केबिन क्रूच्या एका वर्गानं काल रात्री अचानक आजारी असल्याचं सांगत रजा घेतली आहे. परिणामी फ्लाईटला विलंब झाला आणि काही फ्लाईट्स रद्द झाल्यात. या घटनांमागील कारणं समजून घेण्यासाठी आम्ही क्रू मेंबर्ससोबत बोलत आहोत. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आमची टीम वेगानं काम करत आहे.”















Discussion about this post