देशात गेल्या चार दिवसांत उष्णता व उष्माघातामुळे ३२० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांत सर्वाधिक १०० लोकांचा जीव गेला आहे. बिहारमध्ये गेल्या दोन दिवसांत ६३ जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी यूपी-बिहारमध्ये ४० जण्णांच्या मृत्यूची माहिती आहे. यापैकी २५ कर्मचारी आणि अधिकारी हे लोकसभा निवडणुकीच्या कामावर तैनात होते. शनिवारी युपीमधील १३ आणि बिहारमधील ८ जागांसाठी मतदान होत आहे. गेल्या ४ दिवसांत उष्णतेमुळे राजस्थानमध्ये ६०, झारखंडमध्ये ३७, ओडिशात १८, मध्य प्रदेशात २ आणि दिल्लीत एकाचा मृत्यू झाला आहे. झारखंडमधील रुग्णालयांत १,३२६ लोक दाखल आहेत. अनेक ठिकाणी उप्माघाताच्या घॉडाँमध्ये जागाच शिल्लक नाही.
शुक्रवारी यूपीच्या मिर्झापूरमध्ये १ जूनच्या मतदानासाठी मतदान पाट्यांना रवाना जात होते. दुपारी अचानक गस्त घालताना होमगार्ड, कॉनटेल, पीएसीचे जवान आणि निमलष्करी दलाचे जवान खाली पडत होते. काही जण पोलिंग पार्टीसोचत मतदान केंद्रावर पोहोचून बेशुद्ध पडले. दुसरीकडे, वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कारासाठी आहेत. अयोध्येत गेल्या पाच दिवसांत २१ बेवारस मृतदेह सापडले आहेत. उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. कानपूर देशातील सर्वात उष्ण शहर शुक्रवारी कानपुरमध्ये देशातील सर्वाधिक ४८.२ अंश तापमानाची नोंद झाली, हरियाणातील सिरसा ४७.८ अंशांसह दुसऱ्या स्थानी होते. शुक्रवारी दिल्लीत पारा ४५८ अंशांवर होता
महाराष्ट्रात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस
दरम्यान, मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्याच वेळी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत उष्णता कायम आहे. मात्र, शनिवारपासून पुढील ३ दिवस वातावरण बदलणार असून राज्यात ३ जूनपर्यंत वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता नागपूर आणि पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यात सर्वाधिक ४६ अंश तापमानाची नोंद वर्धा येथे झाली. नाशिकमध्ये ३६.५ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ४०.८ अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले, आगामी ७२ तास सरासरी तापमानात २ अंशांनी घसरण होईल















Discussion about this post