नवी दिल्ली । यंदा सध्या राज्यात सूर्य आग ओकत असून उष्णतेत मोठी वाढ होत आहे. असह्य उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून,उन्हाळा कधी संपतो आणि मान्सून येन्याची प्रतीक्षा करत आहेत. अशातच एक आनंदाची बातमी आहे
हवेचा दाब मान्सूनच्या आगमणासाठी अनुकूल असल्याचे सांगितले जात असल्यामुळे लवकरच पावसाबाबत दिलासादायक वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या २१ दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अद्यापही मान्सूनच्या तारखेची माहिती हवामान खात्याकडून पुढे आलेली नाही.
स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार हवेचा दाब मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे यंदा पाऊसमान चांगला राहणार आहे. राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून पाऊसही लवकर येणार असल्याच्या शक्यतेनं शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हवेचा दाब यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता वर्तवत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवनाची गती वाढली आहे. त्यामुळे हवेचा दाब मान्सूनच्या प्रगतीस अनुकूल झाला असून सध्या हा दाब ७०० वरून ८५० हेक्टा पास्कलवर गेल्याने मान्सूनच्या हालचालीचे चांगले संकेत मिळाले आहेत.















Discussion about this post