पुणे : महाराष्ट्रसह देशभरात सूर्यनारायण आग ओकत असल्याने नागरिक उष्णतेने होरपळून निघत आहे. उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता याच दरम्यान, हवामान विभागाने मान्सूनबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. मान्सूनचे आगमन चार दिवस उशीरा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सध्या नैऋत्य वाऱ्यांना गती नसून मौसमी वारे दक्षिण अंदमानच्या समुद्रातच आहे. तर 7 जूननंतर मान्सून गतीनं पुढे सरकणार असल्याची अंदाज हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट वेदर या खासगी संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे.अशा स्थितीत मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून हा या वर्षी 4 जून रोजी दाखल होणार आहे. तर केरळात 7 जूननंतर मुसळधार पावसाचा स्कायमेटने इशारा दिला आहे. तर महाराष्ट्रात 9 तारखेपर्यंत आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचं भाकित वेगारीस ऑफ द वेदरने वर्तवलं आहे. त्यापूर्वी वायव्य भारतात 30 मे पर्यंत अवकाळी पाऊस बघायला मिळणार आहे.
Discussion about this post