देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला होता. परंतु जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे सर्वाचे डोळे जुलै महिन्याकडे लागले आहे. मात्र अशातच हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे.
जूनमध्ये रुसलेला मान्सून जुलै महिन्यात दमदार बसरणार आहे. हवामान विभागाने सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशात जुलै महिन्यात 106 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे.
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यांनी सांगितले की, जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परंतु जुलै महिना पावसाचा असणार आहे. या महिन्यात देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. देशात जुलै महिन्यात 280.4 मिलिमीटर पाऊस पडतो. त्यापेक्षा जास्त पाऊस यंदा होणार आहे. जुलैमध्ये महाराष्ट्रासह देशातील किनारपट्टीलगत कमाल तापमान वाढणार आहे.
मान्सूनवर आता ला-निनोचा प्रभाव दिसणार आहे. प्रशांत महासागरात ला-निनोला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगला पाऊस होणार आहे. हिंद महासागरात मान्सूनला अनुकूलबदल दिसून येत आहे. दरम्यान राज्यातील बहुतांशी भागात मंगळवारी ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, रायगड आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.















Discussion about this post