जळगाव/मुंबई । सर्वांचं लक्ष लागून राहिलेला मान्सून महाराष्ट्रात दरवर्षीच्या तुलनेत लवकर दाखल झाला. सध्या मान्सूनने निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात व्यापला आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नाही. मान्सून केव्हा जळगावात एंट्री मारेल याची उत्सुकता जळगावकरांना लागली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
हवामान विभागानं जारी केलेल्या नकाशानुसार नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात विदर्भापर्यंत पोहोचले आहेत. गुजरातमधील नवसारी, महाराष्ट्रात जळगाव, अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत मान्सून दाखल झाला आहे. तेलंगणामध्ये सर्व राज्यभरात मान्सूनचं आगमन झालं आहे. छत्तीसगडमध्येही मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. बिजापूर, सुकमा मलकनगिरी, विझिंग्राम आणि इस्लामपूर जवळ मान्सून पोहोचला आहे.
दरम्यान, जळगावात मान्सून दाखल झाला. पण जिल्ह्यात सुरुवातीलाच पावसाची हुलकावणी दिल्याचं दिसत आहे. सध्या जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळत आहे. यामुळे जिल्ह्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. आता जळगावकरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे















Discussion about this post