नवी दिल्ली । भारतात यंदाचा २०२४ चा मान्सून कसा असेल याबाबत स्कायमेटच्या खासगी हवामान संस्थेने अंदाज जाहीर केला आहे. यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
स्कायमेटच्या अहवालानुसार, यावर्षी जून आणि सप्टेंबरच्या दरम्यान भारतामध्ये सामान्य मान्सून राहण्याची शक्यता आहे. देशात ८६८.६ मिलीमीटर पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. म्हणजेच नेहमीच्या सरासरी च्या 102 टक्के म्हणजे सर्वसाधारण पाऊस पडेल, असा स्कायमेट वेदरने वर्तवला आहे. निनोचं ला निनो मध्ये रुपांतर होत असल्याने महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
‘मान्सून फोरकास्ट 2024’ या शीर्षकाच्या अहवालानुसार भारताच्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात अनुकूल पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या मुख्य मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेल्या भागात पुरेसा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तर बिहार, झारखंड, ओडिसा, आणि पश्चिम बंगालसहित पूर्व राज्यांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. स्कायमेटनुसार केरळ, कोकण, कर्नाटक आणि गोव्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. देशाच्या मध्य भागात सामान्य पाऊस होणार आहे.
स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांच्या मतानुसार, अल निनो जलद गतीने ला नीनामध्ये बदलत आहे. ला नीना वर्षांमध्ये मान्सूनमध्ये मजबूतपणे रुपांतरीत होत आहे. सुपर एल निनोचे मजबूत ला निनामध्ये संक्रमण झाल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या चांगला मान्सून तयार झालाय. एल निनोच्या अवशिष्ट परिणामांमुळे नुकसान होण्याच्या जोखमीसह पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊ शकतो.















Discussion about this post