मुंबई । मान्सून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे.
गेल्या 24 तासांत निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाला आहे. 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्याची हवामानाची स्थिती पाहता मान्सून 31 मे रोजी भारतात दाखल होईल. त्यानंतर पुढील सात ते आठ दिवसांमध्ये मान्सून तळकोकणात दाखल होईल.
त्यानंतर दोन दिवसांत म्हणजे 13 जूनच्या आसपास मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील आणि मुंबईतील नागरिकांना उकाड्यापासून सुटका होण्यासाठी आणखी किमान 20 दिवस वाट पाहावी लागेल, असे चित्र सध्या दिसत आहे. तत्पूर्वी मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील.
Discussion about this post