मुंबई । गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारातील घडामोडीमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत बदल होत आहेत. सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून या काळात बाजारात सोन्याची मागणी वाढते. गेल्या संपूर्ण आठवड्यात सोनं खरेदी करणाऱ्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला होता. मात्र आज नवीन आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव कमी झाले आहेत.
Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज २७ जानेवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 170 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे.सोबतच चांदीचा दर देखील १ हजारापर्यंत घसरला आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,555 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 60,440 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 75,550 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 82,400 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 65,920 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,240 रुपयांनी विकलं जात आहे.
चांदीचा एक किलोचा दर ९०००० रुपयापर्यंत आहे.
Discussion about this post