मुंबई । उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वी आज ठाकरे गटाचा शिवसेनेने मुंबईत राज्यव्यापी शिबीर आयोजित केलं असून यादरम्यान, संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली. आमचं सरकार येऊ द्या, मोदी-शाह आणि फडणवीस 24 तासांत शिवसेनेत प्रवेश करतील असं ते यावेळी म्हणाले.
सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे तीन जण देश चालवत आहेत. उद्या आमचं सरकार येऊ द्या, मोदी-शाह आणि फडणवीस 24 तासांत शिवसेनेत प्रवेश करतील. त्यानंतर तुम्ही सामनामध्ये बातमी वाचाल ईडीच्या भीतीने शाह, मोदी, फडणवीस शिवसेनेत प्रवेश करणार, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावरही घणाघाती टीका केली, त्याशिवाय मोदी-शाह यांच्याशी आमचे कोणतेही भांडण नाही, आमचे भाडंण महाराष्ट्रद्रोह्याशी आहे, असेही सांगितले. 2024 ला सुद्धा हा देश आपल्याला ताब्यात घय्याचा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
Discussion about this post