हिंगोली | शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा नवीन ऑडिओमुळे चर्चेत आले आहे. आमदार संतोष बांगर आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांमधील संवाद शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ पाटील यांनी व्हायरल केला आहे.
काय आहे ऑडिओ
अयोध्या पौळ पाटील यांनी व्हिडीओ व्हायरल केला आहे. काय रे सर्वजण माझ्या लाडक्या #गद्दार दादुड्याचा आवाज विसरले का? तर मग ऐका…..कामचोरपणा कसा करावा हे शिकवणारे गद्दार लोकप्रतिनिधी व लाईनमन यांचे संभाषण…. असे लिहित अयोध्या पौळ यांनी हा संवाद ट्विट केला आहे. संवादात आमदार संतोष बंगार यांनी यापुढे तू गावकऱ्यांना सांगून दे, माझ्याने काम होत नाही, मी तुमचे गाव सोडत आहे, असे म्हणताना दिसत आहे.
काय रे सर्वजण माझ्या लाडक्या #गद्दार दादुड्याचा आवाज विसरले का? तर मग ऐका…..
ऐका #कामचोरपणा कसा करावा हे शिकवणारे गद्दार लोकप्रतिनिधी व लाईनमन यांचे संभाषण….@OfficeofUT@AUThackeray @iambadasdanve @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks pic.twitter.com/ie0PBFcQBX
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) November 22, 2023
काय झाला संवाद
लाईनमन बोलत आहे. चव्हाण साहेबांचा फोन आला होता. तुम्ही सांगितल्यामुळे ते गाव घेतले आहे. मोठी कामे तुमच्यापर्यंत आली तर आम्ही हक्काने करतो. पण किरकोळ कामे तुमच्याकडे येत आहे. फ्यूज गेला, यासाठी हिवऱ्यासारखे गावातील लोक, डांगे कंपनी तुम्हाला फोन करत असतील कसे करावे. या गोष्टींमुळे मी ते गाव घेत नव्हतो. आता सीझन सुरु झाल्यावर जास्तच त्रास होत आहे. त्यावर आमदार बांगर म्हणतात की, आता तू जा आणि त्यांना सांग, मी हे काम करतो. पण माझ्याने यापुढे ही कामे होणार नाही. मी तुमचे गाव सोडून देत आहे. एकादा तू असे गावकऱ्यांना बोलून ये, असा सल्ला आमदार देत असल्याचे ऑ़डिओतून दिसून येत आहे.
Discussion about this post