मुंबई । आज विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होत असून महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार असे एकूण १२ उमेदवार रिंगणात आहे. एक उमेदवार पडणार एवढं निश्चित. पण तो कुठल्या बाजूचा? याचीच उत्सुक्ता आहे. कारण कुठल्या पक्षाची मत फुटतात? याकडे सगळ्यांच लक्ष आहेयातच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला असून आपण कोणाला आणि का मतदान करणार? ते त्यांनी स्पष्ट केलं.
“आम्ही दोन वर्ष शिंदे साहेबांसोबत आहोत. आताही त्यांच्यासोबत आहे. त्यांनी मतदारसंघात भरपूर निधी दिला. मी स्वत: आणि राजकुमार पटेल आम्ही दोघे शिंदे साहेबांसोबत जाऊन मतदान करणार आहोत” असं बच्चू कडू यांनी सांगितलं. 12 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे मत फुटण्याची शक्यता आहे, त्या प्रश्नावर बच्चू कडू यांनी “एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच एकही मत फुटणार नाही. बाकीच्यांच मला सांगता येत नाही” असं उत्तर दिलं.
विरोधकांची मत फुटतील अशी चर्चा आहे, त्यावर बच्चू कडू म्हणाले की, “मी माझी गॅरेटी घेतो. राजकुमार आणि बच्चू कडू दोघांच मत शिंदेच्या उमेदवाराला जाणार. भावना गवळी आणि कृपाल तुमाने दोघांना आम्ही मतदान करणार. दोघे विदर्भाचेच आहेत” “मतदारसंघात आम्हाला भरपूर निधी मिळाला. आम्ही कर्तव्य बजावणार. या सरकारमध्ये खूप निधी मिळाला. त्याची जाण ठेऊन आम्ही मतदान करणार. कोण हरणार? कोण जिंकणार? हे आत्ताच सांगू शकत नाही” असं बच्चू कडू म्हणाले.
Discussion about this post