चाळीसगाव । चाळीसगाव शहरातील मिरची बाजाराला आज २ वाजेच्या सुमारास अचानक मोठी आग लागली. या आगीत १२ दुकानांसह एक मालट्रक व दुचाकी जळून खाक झाली आहे.दरम्यान या आगीत ५० लाखाच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटना शेजारी पेट्रोलपंप असल्याने मोठी खळबळ उडाली. दरम्यान अग्निशमन दलाने तत्काळ आग विझविण्यास सुरुवात केल्याने हा पेट्रोलपंप आगीच्या चपेट्यात आला नाही.
याबाबत असे की, चाळीसगाव शहरात नागद रोडवर मोठा मिरची बाजार भरतो. येथे अनेक व्यापारी त्यांचे दुकाने लावून व्यवसाय करतात. आज शुक्रवारी दि. ११ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे बाजारात गजबज होती. अचानक बाजाराला एका बाजूने आग लागण्यास सुरुवात झाली. या आगीने मोठे रौद्र रूप धारण केल्याने एकच धावपळ उडाली.
मात्र जवळील एक मालट्रक आणि बाजारातील दुचाकी जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाल तत्काळ ३ बंब घटनास्थळी दाखल झाले. बाजाराच्या बाजूला असणारा डॉ. अविनाश जाधव यांचा अविरेखा पेट्रोलपंपाजवळ आग जाणार होती. अग्निशमन दलाने तत्काळ आग विझविण्यास सुरुवात केल्याने हा पेट्रोलपंप आगीच्या चपेट्यात आला नाही. दरम्यान मिरची बाजाराच्या आगीत सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहेत.सुमारे ५ किलोमीटरपर्यंत आगीचा धूर दिसून येत होता.
Discussion about this post